डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना नक्की करत कोण ?

<img src="ambedkar-statue-insulted.jpeg"=dr.babasaheb ambedkar-statue-insulted">
डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांन इथल्या हजारो वर्षांपासून खितपत पडलेल्या समाजासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी यशस्वीरीत्या लढा दिला आणि त्यांना ह्यातून बाहेर काढले .भारताला संविधान देऊन या समाजाला आणि देशभरातील सर्व नागरिकांना समतेचाच न्याय दिला .

अश्या महापुरुषांचा पुतळा त्यांच्या हयात असताना कोल्हापूर मध्ये एका मराठा समाजाच्या व्यक्तीने उभारून त्यांना एक प्रकारची आदरांजलीच दिली .बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर सुस्तावलेल्या आंबेडकरी चळवळीला वेगाने वादळ
निर्माण केलं ते मान्यवर कांशीरामजी यांनी .आणि पुढे आंबेडकरी युगाची लाट वाढू लागली .

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र पुतळे सर्व देशभर दिसू लागले .पण त्याच बरोबर काही मनू प्रवृत्तीही तेवढ्याच वेगाने वाढत होत्या .अश्यातच कानावर पडू लागल्या  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाच्या घटना .त्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे घाटकोपर मुंबई येथील रमाबाई कॉलनी मधील हत्याकांड .आजही या घटनेची आठवण होताच अंगावर काटा उभा राहतो आणि डोळ्यासमोर येतात फक्त बाबासाहेबां साठी प्राणाची आहुती दिलेल्या कित्येक भीम सैनिकांचे रक्ताने माखलेले चेहरे आणि ऐकायला येनाऱ्या त्यांच्या मायबापाच्या मनाला हादरून सोडणार्या त्या किंकाळ्या.

विटंबना सत्र हे आजही चालूच आहे .का नाही थांबत ते ? मग अश्या घडणार्या घटनांना नक्की जबाबदार कोण ? हा मुख्य प्रश्न आहे .काय याला प्रशासन जबाबदार आहे कि स्वता: आंबेडकरी समाजाच .


डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महा-निर्वाणापूर्वीच १४ ओक्टोम्बर १९५६ ला नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती; आणि नंतर तर जवळ जवळ दहा लाख लोकांनी बाबासाहेबांच्या मृत्यू शय्येसमोर मुंबई दादर येथे डोळ्यातून  वाहणाऱ्या अश्रुनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली .धर्मपरिवर्तनाच्या जगातिल एकमेव अश्या या दोन घटना आहेत ज्या रक्ताचा थेम्ब हि न सांडता भारतात घडल्या आहेत. नागपूरच्या प्रसंगी बाबासाहेबानी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची नीती ,त्रिशरण पंचशील आणि त्यासोबत पुन्हा मागे न वाळण्यासाठीच २२ प्रतिज्ञा दिल्या . याच २२ प्रतिज्ञा सर्वात मोलाच्या आहेत .पण त्याच मोल आजही आपल्याला बहुतेक कळलेल्याच नाहीत. बाबासाहेबाना काय गरज होती त्या प्रतिज्ञा देण्याची , नुसता बुद्ध धम्म दिला असता तरी आमचं त्यात भागाल असत.कारण बाबासाहेबानी देशाला दिलेल्या संविधानाच्या अधिपत्याखाली आरक्षणाचा फायदा नक्कीच आपलयाला मिळणार होताच . 
बाबासाहेबानंतर आंबेडकरी समाज बौद्ध नव-बौद्ध शिकला सवरला .काहींना डॉ आंबेडकर कळाले ते खर्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला लागले तर बरेच लोकांना बाबासाहेब कळलेच नाहीत .आणि इथेच खरी सुरुवात झाली बाबासाहेबांच्या विटंबनेची .
<img src="ambedkar-statue-insulted.jpeg"=dr.babasaheb ambedkar-statue-insulted">
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा देण्यामागची मुख्य कारण हे होते कि ज्या हिंदू देवी देवतांनी आणि इतर उच्चं जातींनी तुम्हा आम्हा सर्वांकडे पाठ फिरविली नि लाथाडलं आणि या प्रतिद्न्यांच तुम्ही पालन करून त्यांच्याकडे तुम्हीही पाठ फिरवा आणि आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करन नव्या दिशेने झेप घ्या.ह्या हिंदुधर्मातून बाहेर पडा यात फक्त ब्राह्मणांचा स्वार्थ आहे बाकी कुणाचाही नाही. 
 .
पण .... आज आपण काय पाहतो
 • ज्या बुद्धा समोर आपण त्रिशरण पंचशील म्हणून मी मद्यपान करणार नाही असं म्हणतो आणि संध्याकाळी ,आठवड्यातून किंवा मित्रभेट झाल्यावर दोन घोट घेतो .मग असं आपण का करतो हि बुद्ध धम्माची आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना नाही का ? बाबासाहेबानी तुमच्या सर्व जुन्या पद्धती बंद व्हाव्यात यासाठी बौद्ध धम्म दिला आणि तुम्ही ... नवीन वर्ष सुरु होण्या अगोदर तर विचारूच नका, ३१ डिसेंबर सर्व एकत्र मिळून एकदम जोशात साजरा केला जातो
 • नवीन वर्षांची सुरुवात झाल्यावर येणाऱ्या पहिल्याच मकर-संक्रान्ती सणाला तर "तीळ गुल घ्या गोड गोड बोला" असं बोलून आपण अश्या हिंदू परंपरेला नकळत साथ देत असतो.काय हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे . 

 • नंतर येणाऱ्या होळीला तर बिनधास्तपणे रंग उडविणारी परंपराच आहे असं समजतात .जळणाऱ्या  होळी मध्ये विशिष्ट लोकांच्या नजारा चुकवत नारळ अर्पण करतो ,काय हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे .काय आहे होळीचा इतिहास हे तुम्हाला माहीत नाही का ? 

 • आंबेडकर जयंती ते बुद्ध पौर्णिमा या दोन महत्वाच्या दिनी सर्वात जास्त जल्लोष असतो कोणत्याही  समाजात .नाचणे गाणे हे आनंद व्यक्त करण्याचं प्रतीक आहे .आणि आपला समाज यात चांगला पारंगत आहे यात काही वादच नाही. पण मुख्य वाद आहे तो दारू पिऊन धिंगाणा करण्याचा .हि दारू पिऊन आपण इतर लोकांना काय दर्शवितो कि आमच्यासारखे आम्हीच .यात काही भीम सैनिक अपवाद आहेत जे अधून मधून नशा करू नका याचा प्रचार आणि प्रसारही करत असतात .पण आपलं मन... आपण मात्र या आनंदाच्या प्रसंगी आवरू शकत नाही .मग अश्यावेळी कुठं जातो बौद्ध धम्मच तत्वज्ञान  मग हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे . 

 • तसेच येणाऱ्या रक्षाबंधन भाऊबीज म्हणजे कहरच .बौद्ध धम्मात धागा बांधणे आणि बांधून घेणे हे सूत्रच नाही पण आपण यातून कधी बाहेर पडनार.बरेच समाज सुधाकरक-कार्यकर्ता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात.पण ते आपण एका कानाने ऐकतो तर दुसऱ्या कानाने बाहेर सोडतो. मग हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे . 
 • जिम मध्ये जाऊन बॉडी बनवायला सर्वाना आवडतेच त्यात आंबेडकरी समाजातील युवक हमखास जिम मध्ये दिसतात .या जिमचा वर्षातून येणाऱ्या सणामध्ये बौद्ध तरुणांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो .होय बरोबर ओळखलंत. दहीहंडी मध्ये आपल्या समाजाची पोर जास्त प्रमाणात आहेत .अरे ज्या बाबासाहेबानी तुमच्याच गळ्यातील मडके फोडून तुम्हाला माणूस बनविले त्या बाबासाहेबांची हि विटंबना नव्हे काय ?

 • महाराष्ट्रातून प्रामुख्याने सगळ्यात मोठ्या उत्सवात साजरा होणारा सण म्हणजे "गणेशोत्सव" . आता तर आंबेडकरी समाज बिनधास्त पणे गणपती घरात बसवितो,आपल्या गल्लीत बसवितो,आपल्या सोसायटीत बसवितो,मस्तपैकी बाबासाहेबांच्या फोटोसहित गणपतीचाही फोटोचा बॅनर लावतो .आणि वर तोंड करून म्हणतो "आता कुठे आहे जातीवाद आणि जर समाजात राहायचं असेल तर असे कार्यक्रम करावेच लागतात". याला बर्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी भंतेंनी विरोध केला पण ते असले प्रकार थांबविण्यात अपयशी ठरत आहेत.हि सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे .अरे ज्या बाबासाहेबानी आपल्या २२ प्रतिज्ञेमध्ये तिसरी प्रतिज्ञा हि गणपतीचीच आहे.तरीपण ... मग हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे .त्यात अजून असे लोकही आहेत जे गणपती बसवत नाहीत पण आपल्या पोरा बाळांसोबत लपून छापून ( फक्त डेकोरेशन पाहण्याच्या बहाण्याने ) गणपतीच्या मंडपात जाऊन त्यांच्या जुन्या बाप्पाचे दर्शन घेतात .आता काय बोलणार यांना . 

 • "दसरा संमेलन" .ज्या सम्राट अशोकाने शोकाकुल होऊन आपल्या अंतिम कलिंग युद्धानंतर आपली हत्यार टाकली तो दिवस म्हणजे विजयादशमी .त्यानंतर बाबासाहेबानी १९५६ मध्ये याच दिवशी पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन पुन्हा एकदा अशोक चक्र भारतात विराजमान केले .तर आपले बांधव आजही घरात असलेल्या चाकू सूरी लोखंडी वास्तूची हत्यारांची पूजा करतात. एका ठिकाणी धम्म चक्र परिवर्तनाचा कार्यक्रम चालू असतो तर घरात मात्र पूजेचा कार्यक्रम .मग हि बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना नव्हे काय .
 • दिवाळी म्हणजे देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा होणारा सण. ज्यावेळी गौतम बुद्ध झाल्यावर आपल्या कपिल वास्तूत आले आणि जेव्हा सम्राट अशोकाने ८४००० स्तूप बनवून एका दिवशी संपूर्ण नगरीत दीप प्रज्वलित केले तो दिवस म्हणजे दीपावली .आपणही साजरी करायला हवी .पण इथेही आपला मुख्य इतिहास न जाणताच आपण साजरी करतो .

अश्या एक ना अणे उदाहरणे आहेत जिथे तिथे  आपणच बाबासाहेबांची विटंबना करतो . 

अश्यातच अजूनही काही गोष्टीकडे आपले लक्ष देणे गरजेचं आहे .
 • ज्याठिकाणी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर अथवा गौतम बुद्ध यांचे बॅनर फलक डॉ लोखंडी खांबामध्ये लावतो त्याठिकाणी आपोआपच कचरा गोळा होत जातो .बांधताना मात्र आपण सर्व जण एकत्र येऊन जागेची साफ सफाई करून जय भीम जय बुद्धाच्या घोषणा देतो पण लावल्या नंतर मात्र त्याकडे नक्कीच दुर्लक्ष करतो .तुम्ही पहाल आपल्याच आसपास ज्याठिकाणी हे बॅनर असतात भलेही ते आर पी आय / भारिप / किंवा अन्य संघटनेची असली तरीही त्याठिकाणी घाणच असते .याकडे कोण लक्ष देणार ?   

 • बाबासाहेबांच्या नावाने सामाजिक संस्थेचं गृह बांधतो अथवा बुद्ध विहार बांधतो आणि त्याच्या आसपासचा परिसरामध्ये खासकरून त्याच्या मागच्या बाजूला न जाणे कुठून हळूहळू कचरा गोळा होत जातो . तो तिथं का आणि कसा येतो याचा शोध कोण घेणार आणि त्याच निवारण कोण करणार . 

 • बुद्ध विहार बांधणे हा आता छंद झाला आहे .आपण बघितलं असणारच ६ डिसेंबर मध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी नक्की हातात धम्मदानासाठी डब्बे घेऊन उभे असणारे आपले भीम सैनिक .तर काही नक्कीच प्रूफ म्हणून पावती फाड योजना आणतो .आता या पैकी किती विहार बांधली यात जायायची गरज नाही .मुळात बुद्ध विहार बांधणे म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासारखे आहे .पण विहार बांधल्यानंतर फक्त ते विहार वर्षातील नेमक्या खासकरून तीन चार दिवशी म्हणजेच आंबेडकर जयंती बुद्ध पौर्णिमा धम्मचक्रपरिवर्तन यासाठीच उघडतो जास्तीत जास्त लग्न कार्य नामकरण विधी पुरताच त्या विहाराकडे लोकांची भरणा होते .आणि इतर दिवशी मात्र शुकशुकाट असतो .त्यात फारच कमी विहारे सभागृह आहेत जी रेगुलर काही सामाजिक उपक्रम राबवितात .बहुतेक  बुद्ध विहारे हि जीर्ण अवस्थेत आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न करा

 • लग्नाच्या आदल्या रात्री म्हणजेच हळदीच्या कार्यक्रमात ( आता हळू हळू बौद्ध समाज हळदीचा कार्यक्रम ठेवत नाहीत किंवा तो फक्त आपल्या घरातील लोकांपुरतेच मर्यादित ठेवतात ) दारू आणि मटण असलच पाहिजे जर नसेल तर त्यादिवशी म्हणावी तितकी भाऊ-बंधकी मित्र सोयरीक वगैरे यांची उपस्तीथी बोटावर मोजण्या इतकीच असते .

 • तसाच प्रकार नामकरण विधीलाही होत असतो .अश्या प्रकारे आपण स्वता:ला तर फसवितोच आणि बदनाम होतोच पण त्याबरोबर आपल्या धम्माचीही बदनामी करतो ,आपल्या बाबासाहेबांची बदनामी करतो .   
 • यात एक मुद्दा अजून आहे आणि तो सर्वांच्या आयुष्यातील प्रमुख आहे. जर का तुम्हाला लग्न कार्य करायचं आहे ,नामकरण विधी कार्यक्रम करायचा आहे किंवा अन्य कोणताही कार्य करायचं आहे ,तो यशस्वी होण्यासाठी हमखास मेजवानी द्यावीच लागते .एकाच समाजात राहून आपण एकमेकांशी असं का वागतो .बुद्धांचा मैत्रीचा आदर्श हाच आहे का ?
 • हे वाचा : एक बोधकथा - बाबासाहेबांचा फोटू
आम्ही तुम्हीच बाबासाहेबांचा आजवर अपमान करत आलोय अर्थात ती हि एक प्रकारची विटंबनाच होय. .आपण गेल्या साठ वर्षांपासून बाबासाहेबांच्या विचारांची ,त्यांनी दिलेल्या बौद्ध धम्माची ,त्यांनी दिलेल्या शिकवणीची ,त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञाची विटंबना आपण करत आहोत. पुतळ्याची विटंबना झाली कि आंबेडकरी समाज पेटून उठतो,भीम सैनिकाकांचं रक्त खळवळलं जात पण काय उपयोग तुम्ही तर सुरुवातीपासूनच बाबासाहेबयांची विटंबना करत आलात आहात. महिन्यातून एखाद दुसरं उदाहरण मिळत पुतळा विटंबनेच्या  पण आपण प्रत्येक क्षणाला बाबासाहेबांची विटंबना करत असतो .पुतळ्याची विटंबना तेच करतात ज्यांना बाबासाहेबां बद्दल काही माहीत नाही ,कोणताही आदर नाही फक्त तिरस्कार आहे त्यांच्या मनात किंवा कोणीतरी चिथावले म्हणून ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात. पण तुम्ही आम्ही आपण तर बाबासाहेबाना तर इतकं मानतो कि ते आपले दैवतच आहे .त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याची आपल्याला जाणंही आहे. पण मग असं का ?
विटंबना थांबविण्याचा एकाच मार्ग आहे तो म्हणजे स्वता:मध्ये आंबेडकर जागवा,स्वता:त बुद्ध तयार करा ,स्वता:मध्ये  मैत्री-भाव जागवा. बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञाचे योग्य ते पालन करा .बौद्ध धम्माचे योग्य पालन करा. आणि स्वता: बरोबर आपल्या या समाजाला यातून बाहेर पडन्यास मदत करा. जेव्हा हे सर्व स्वता:पासून कराल तेव्हा बाबासाहेबांची मूर्तीची विटंबना करायला येणाऱ्या दुष्मनालाही वाटेल कि " आपण हे चुकीचं करतोय,एवढा मोठा हा आदारान वागणारा समाज्यासी वैर कस घेऊ मी". आणि तोही बाबासाहेबांपुढे आदराने नतमस्तक होईल .आणि तेव्हाच खरे बौद्ध पर्व यायला जास्त दिवस लागणार नाही .0 comments:

Post a Comment